पोलीस अधिक्षक, वर्धा यांनी आपत्ती व्यवस्थापन संबधात आढावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हयात आगामी मान्सून काळात उद्भवणाऱ्या पुर परिस्थिती, चक्रिवादळ लक्षात घेता वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी या काळात नागरिकांचे जिवितास व त्याचे मालमत्तेचे सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस दलाचा आपत्ती व्यवस्थापन आढावा घेतला. सदर आढाव्यामध्ये खालीलप्रमाणे उपाययोजना करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
वर्धा जिल्हयातील नदी, नदीवरील धरण, तलाव व त्यालगत असलेल्या गावाची माहिती घेवून जास्त पाऊसामुळे कुठे पुरपरिस्थिती निर्माण होवुन जनजिवन विष्कळीत होवु शकते याबाबत आढावा घेण्यात आला. पोलीस विभागाकडे आपत्ती व्यवस्थापन संबंधाने आवश्यक साधन सामुग्री उदा. जिवन रक्षक बोट, लाईफ जॅकेट, टॉर्च, दोरी व इतर साहित्य यांचा उपलब्धता व सुस्थितीती बाबत माहिती घेण्यात आली. पोलीस स्टेशन स्तरावर पोहणारे लोकांचे नाव व मोबाईल क्रमांक घेवुन यादी तयार करणे तसेच पोलीस मुख्यालय आणि सर्व पोलीस ठाण्यांमध्ये २४x७ आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरु करण्याबाबत सुचना देण्यात आली. पुरपरिस्थिती क्षेत्रांमध्ये तात्काळ मदतीसाठी क्विक रिस्पॉन्स टिम आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्याबाबत आढावा घेवुन आपत्ती वेळेस पोलीसांची विशेष गस्त वाढवण्यात यावी याबाबत सुचना देण्यात आले. अतिवृष्टीमुळे रस्ते पाण्याखाली गेल्यास वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाचे नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
नागरिकांना पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येते कि, त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत, मदतीसाठी तात्काळ डायल- ११२ किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक ०७१५२-२३२५००,२३२५२० वर संपर्क साधावा. पोलीस प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे. आपत्तकालीन वेळेस नागरिकांनी अफवा किंवा सोशल मिडीयावरील अप्रमाणीत संदेशावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, वर्ध



