ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू मालाची वाहतुक करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अवैध दारू विक्री व वाहतुक करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने दारू विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 15 जुन 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पो.स्टे. सेलु हद्यीतील दंढारे टि-पॉईंट, सेलु येथे स्कॉर्पिओ वाहन क्र. एम.एच. 46 ए.एल.5664 वर सापळा रचुन प्रो.रेड केला असता, आरोपी 1) तेजस राजेंद्र मांढरे व 2) प्रणय मारूती डुकरे दोन्ही रा. सेलु, जि. वर्धा हे संगणमताने मोठ्या प्रमाणात 30 खरर्ड्याचे खोक्यात विदेशी दारू व 01 खरर्ड्याचे खोक्यात बिअर दारू मालाची वाहतुक करतांना मोक्कावर रंगेहाथ मिळुन आल्याने, त्यांचे ताब्यातुन एक स्कॉर्पिओ वाहन व विदेशी व बिअर दारूचा माल जु.कि. 17,12,400 रू चा मुद्देमाल जप्त केला व सलग दुस-या कार्यवाहीमध्ये आरोपी सुलभ ज्ञानेश्वर डायगव्हाणे, वय 30 वर्ष, रा. वाहितपुर वार्ड नं. 03 सेलु, जि. वर्धा हा त्याचे अल्टो कार क्र एम.एच. 32 सि. 0860 मधुन 02 प्लास्टीक पिशवींमध्ये देशी दारूने भरलेल्या 200 शिशा मालाची वाहतुक करतांना मिळुन आला. त्याचे ताब्यातुन एक अल्टो कार व देशी दारू जु.कि. 2,70,000 रू अशा एकुण दोन्ही कार्यवाहीमध्ये एकुण जु.कि. 19,82,400 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीतांविरूध्द पो.स्टे. सेलु येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये