विहिरीत पडलेल्या पाच नीलगायीला वन विभागाच्या पथकाने दिले जीवदान
वनपरिक्षेत्र अधिकारी वर्धा प्रादेशिक कुमारी वैशाली भलावी व यांच्या कर्मचाऱ्यांनी केली मोठी कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 12 जून 2026 रोजी वनपरिक्षेत्र वर्धा (प्रा) सहवनक्षेत्र वडनेर अंतर्गत मौजा पिपरी येथे एका विहिरींमध्ये पाण्याच्या शोधामध्ये असलेल्या पाच निलगाय पडल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली हि माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. हरविंदर सिंग तसेच बोर व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य संचालक महेश ठेंगडी यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमने विहिरीची पाहणी केली असताना विहिरीत पाच नीलगाय अडकून पडलेल्या आढळून आल्यास त्यानंतर वन विभागाच्या पथकाने अथक प्रयत्नाने नीलगायीच्या सुखरूप सुटका करून नीलगायची आवश्यक काळजी घेत त्या पाच निलगाय यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या यशस्वी बचाव मोहिमेमुळे वन्यजीव संरक्षणाबाबत वन विभागाची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित केलेल्या कारवाई मूळे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कु. वैशाली भलावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये क्षेत्र सहाय्यक वडनेर जी. एस. सयाम, वनरक्षक प्रशांत कनेरी, अमोल ढाले, माधव माने, अरुण गिते, त्रषिकेश गोडसे, वाहन चालक मनोज गोडसे असपाक पठाण वाहन चालक मनोज गांडूळे व इतर रेस्क्यू टीममधील इतर सदस्य आणि वनविभाचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या या तत्पर आणि यशस्वी बचाव कार्याचे काम केल्याबद्दल कौतुक केलेले आहे.



