ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या एका वाहन चालकावर कार्यवाही

विलास पाटील पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा यांची मोठी कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरीकांनी पालन करावे या करीता पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा व अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे जिल्हा वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता वरीष्ठांनी ब्रिथ ॲनीलाइझर सह संपूर्ण वर्धा जिल्ह्यात नाकेबंदी, विशेष मोहीम राबविण्यात आली त्या अनुशंगाने दि. 12/06/2026 रोजी वर्धा शहरात मार्शल पेट्रोलींग दरम्याण पोलीस अंमलदार पोलीस हवालदार मुकेश राऊत, पोलीस हवालदार चंद्रकांत तपासे यांनी इतवारा चौक येथे चेक केले असता नमुद 1) वाहन चालक क्रमांक MH 32 BB 7783 टुव्हिलर पल्सर चा चालक नामे सुरज राजेश नागोसे वय 36 वर्ष रा. महाकाळ त. जि. वर्धा यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूच्या नशेत चालवितांना मिळुन आल्याने त्या वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ ॲनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असताना तो वाहन चालक 303.8 टक्के दारू पिल्याचे अल्कोहोल मिळून आले अल्कोहोल प्रमाण मिळुन आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायदा 188 कलम 19 लायन्स निलंबित प्रस्ताव पाठविण्यात आला आहे वरुन 2026 मध्ये संपूर्ण सर्व वर्धा जिल्हा वासियांना ड्रंक और डार्विनच्या कायद्यान्वये गुन्हा नोंद करून सदर वाहन चालक यांने वाहन चालविण्याचा परवाना सोबत बाळगल्याने सदरचा वाहन परवाना आर.टि.ओ सा. यवतमाळ यांचे कडे मोटर वाहन कायदा 1988 कलम 19 अन्वये लायसन्स निलंबन प्रस्ताव कामी पाठविण्यात येते. वरून सन 2026 मध्ये पुर्ण वर्धा जिल्हयाच्या ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह च्या एकुण 153 केसेस, एकुण लायसन्स निलंबन प्रस्ताव 51 पाठविण्यात आले, एकुण 129/177 हेल्मेटच्या 1444 केसेस, अवैद्य प्रवासी वाहतुकच्या 66(1)/192(अ) एकुण 97 केसेसे करण्यात आल्या आहे. वर्धा शहर पेट्रोलींग दरम्याण दारू पिवुन वाहन चालवु नये, हायवेवर टुव्हीलर चालवितांना हेल्मेट वापरावे, फोरव्हीलर चालवितांना सिटब्लेट लावावा जेणे करून अपघाताचे प्रमाण कमी होईल अशा वारंवार सुचणा देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.

तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक,विलास पाटील वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरीकांना करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये