ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

३० जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास पीएम-किसान योजनेपासून वंचित

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी शासनाकडून महत्त्वाची सूचना देण्यात आली असून, केंद्र सरकारने योजनेतील लाभार्थ्यांसाठी ३० जूनपर्यंत ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो.

केंद्र शासनाने पीएम-किसान योजनेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना रोखण्यासाठी ई-केवायसी सक्तीची केली आहे. त्यामुळे योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याने आधार पडताळणीसह ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अनेक शेतकरी अद्याप ई-केवायसीपासून वंचित असल्याची माहिती समोर येत आहे. अशा शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, ई-केवायसीसोबत आधार क्रमांक, बँक खाते आणि जमीन नोंदीतील माहिती अद्ययावत असणेही आवश्यक आहे. या माहितीमध्ये तफावत असल्यास पीएम-किसानचा हप्ता अडकू शकतो.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता त्वरित ई-केवायसी पूर्ण करून पीएम-किसान योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये