ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरमसूर पुनर्वसनाबाबत आमदार तथा पालकमंत्री पंकज जी भोयर यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

आयुक्ताच्या कलम 11अधिसूचना चा होतोय संबंधित वनविभागा कडून अवमान कारवाईवर गावकऱ्यांची तीव्र नाराजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गाव-मौजा पुनर्वसन संघर्ष समिती, गरमसूर यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे गरमसूर गावाच्या पुनर्वसन प्रक्रिये ची आयुक्त (राज्यस्व )कलम 11ची अधिसूचना लागूनही होत असलेल्या विलंबाबाबत तसेच वनविभागाच्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत गरमसूर गावाचे पुनर्वसन मंजूर होऊनही अद्याप गावाचे संपूर्ण पुनर्वसन झालेले नाही. अशा परिस्थितीत वनविभागाकडून गावकऱ्यांवर ऐक प्रकारे अन्याय करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पुनर्वसनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन लवकर स्तलांतरन करण्यास वनविभाग ने प्रयत्न करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करून गावकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा भविष्यात जंगली जनावर व्याघ्र व मानव संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

हे निवेदन बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गाव-मौजा पुनर्वसन संघर्ष समिती, गरमसूर यांच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये