केळझर धम्मभूमी येथे श्रमण शिक्षा अभियान; अभिनेता गगन मलिक यांचे मार्गदर्शन
पी. एस. खोब्रागडे साहेब यांच्या कार्याची प्रशंसा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
श्रमण शिक्षा अभियानांतर्गत केळझर येथील धम्मभूमी येथे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते गगन मलिक यांनी श्रमणेर, श्रमणेरी तसेच उपासक-उपासिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना गगन मलिक यांनी सांगितले की, “ज्या पद्धतीने इतर देशांमध्ये भन्ते संघ मजबूतपणे कार्यरत आहे, त्याचप्रमाणे भारतातही भन्ते एकत्र येऊन सशक्त संघाची निर्मिती करावी आणि संघराजाची संकल्पना बळकट व्हावी,” असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजात धम्माचा अधिक प्रभावी प्रसार करण्यासाठी संघटनात्मक एकतेची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रमणेर, श्रमणेरी, उपासक व उपासिका उपस्थित होते. उपस्थितांनी गगन मलिक यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत धम्मकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.



