ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरीत निशुल्क भव्य रोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :_ भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी आम. प्रा अतुल देशकर ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निशुल्क भव्य रोगनिदान व रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये हृदयरोग, कर्करोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, शल्यचिकित्सा, नेत्ररोग, रक्ततपासणी या रोगांचे तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व निदान करण्यात येणार आहे. दि. २७ जुलै २०२६ रोज सोमवारला सकाळी १० वाजता विठ्ठल रुक्मिणी सभागृह ब्रम्हपुरी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. तरी बंधू-भगिनीनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. या शिबिराला विशेष सहकार्य आशा हॉस्पिटल कामठी, नागपूर, डॉ. हेडगेवार रक्तपेढी ब्रम्हपुरी, ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी याचे विशेष सहकार्य लाभत आहे.

रोगांचे निदान झाल्यानंतर आजारावर ऑपरेशन आशा हाॅस्पिटल कामठी, नागपूर येथे निशुल्क करण्यात येईल. नेत्र तपासणी झाल्यानंतर मोतीबिंदू, काचबिंदू, व अन्य ऑपरेशन मोफत नागपूरला प्रतिष्ठित रूग्णालयात निशुल्क करण्यात येईल. असे आयोजक प्रा. डॉ. सुयोग बाळबुधे, तनय देशकर, ज्ञानेश्वर दिवटे, मनोज भूपाल, साकेत भानारकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये