ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदीविरुद्ध आक्षेपार्ह व्यक्तव्य

भाजपा महिला आघाडीकडून कारवाई करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट

काँग्रेसच्या बल्लारपूर शहराध्यक्ष तथा नगरसेविका ॲड. मेघा भाले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अश्लील व शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप करत भाजप महिला आघाडीने तीव्र संताप व्यक्त केला असून

या प्रकरणी संबंधित महिलेवर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत गोंडपिपरी तालुका भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना निवेदन दिले.

ॲड. भाले ह्या सरकारी वकील म्हणून कार्यरत असून नगरसेविका म्हणूनही त्या राजकारणात सक्रिय आहेत. अशा जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीकडून अश्लाघ्य व अपमानकारक वापर करणे, ही गंभीर बाब असून सार्वजनिक जीवनातील मर्यादांचे उल्लंघन असल्याचे मत निवेदनातून व्यक्त करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या या व्हिडिओमुळे भाजपा पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे संबंधित व्हिडिओची तत्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनकर्त्यामध्ये तालुकाध्यक्ष दीपक सातपुते, जिल्हा महिला महामंत्री कोमल फरकाडे, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, नगरसेविका शारदा, रंजना रामगीरकार, वनिता देवगडे, संजय झाडे, राकेश साखलवार, भारती साखलवार यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये