डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन, चंद्रपूरच्या अध्यक्षपदी ॲड. संजय निरंजने; तर सचिव पदी ॲड कपिल नंदेश्वर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :_ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन, चंद्रपूर’ (नोंदणी क्रमांक F-12892 चं.) ची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. राजेश एन. खोब्रागडे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. संजय रतनसिंग निरंजने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष पदाची धुरा ॲड. प्रशांत हरिदास गोंगले यांच्याकडे, तर सचिव पदाची जबाबदारी ॲड. कपिल प्रकाश नंदेश्वर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच, असोसिएशनच्या कोषाध्यक्षपदी ॲड. जगदीप विश्वनाथ खोब्रागडे यांची निवड झाली आहे.
कार्यकारी सदस्य म्हणून खालील वकील बांधवांची निवड करण्यात आली आहे:
१) ॲड. पुनमचंद दादाजी वाकडे
२) ॲड. भिमराव संतोष रामटेके
३) ॲड. खुशाल माधव खोब्रागडे
४) ॲड. कपिल आनंद भगत
५) ॲड. अवधूत दौलतराव मांगे
६) ॲड. अशोक ऋषीजी बारसागडे
७) ॲड. शेषराव वातुजी रंगारी
निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. राजेश एन. खोब्रागडे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले असून, नवीन टीम संघटनेच्या हितासाठी आणि वकिलांच्या विविध न्याय्य हक्कांसाठी जोमाने कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
या नवीन निवडीबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील विधी क्षेत्रातून आणि सर्वच स्तरातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



