ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एकाच दिवशी दहा गावांना मोफत रेतीचा पुरवठा

महसूल विभागाच्या कारभाराने रेतीतस्करांना फायदा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील घरकुल धारक नागरिकांना रेती वाटप एकाच कुलथा घाटावरून सुरू आहे. एकाच दिवशी चकबेरर्डी, आक्सापूर, धानापूर, करंजी, वडकुली, वढोली, चेकबोरगाव, विहिरगाव, खरारपेठ,गोंडपिपरी या १० गावांना रेती वाटप सुरू आहे.

नदीपात्रात ट्रॅक्टर चालकांकडून रेती काढण्यासाठी स्वतंत्र मार्ग बनवला जात आहे, मात्र त्या मार्गावर इतर सामान्य लाभार्थी असणाऱ्या ट्रॅक्टर वाल्यांना एन्ट्री देत नसल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. रेती तस्करांचा कब्जा रेती घाटावर असल्याचे दिसत आहे. तर गर्दीचा फायदा घेत अनेक रेती तस्कर विना रॉयल्टी रेती सुद्धा वाहतूक करत आहेत.

याकरिता एका दिवशी एकाच किंवा दोन गावातील घरकुलधारकांना रेतीचे वाटप करावे जेणेकरून सर्वांना न्याय मिळेल अशा पद्धतीची मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे. योग्य पद्धतीने नियोजन केल्यास शासनाच्या महसूलात वाढ होणार, यात शंका नाही.

      *मोफत रेती वाटप सुरू असले तरी या संपूर्ण प्रक्रियेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घरकुल बांधकामासाठी रेतीची अत्यंत गरज असताना अनेक महिने लाभार्थ्यांना रेती उपलब्ध झाली नाही. मात्र आता बांधकामाचा हंगाम संपत आला असताना आणि अनेक लाभार्थ्यांनी खासगी ठेकेदारांकडून किंवा बाजारातून रेती खरेदी करून घरे पूर्ण केली असताना, अचानक मोठ्या प्रमाणात मोफत रेती वाटप सुरू करण्यात आले आहे.*

      *गोंडपिपरी तालुक्यात सहा ते सात रेतीघाट असून त्या घाटांमध्ये उत्तम दर्जाची रेती उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत केवळ एका घाटावरून रेतीवाटप करण्याऐवजी सर्व रेतीघाट सुरू करून गावनिहाय वाटप करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यामुळे रेती वितरण अधिक सुलभ, पारदर्शक व समतोल पद्धतीने होऊ शकते.*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये