ताज्या घडामोडी

लाचेची मागणी करणारा कोतवाल ए सी बी च्या जाळ्यात

मंजुषा भोसले यांचे नेतृत्वात जिल्ह्यात पहिली कार्य वाही

चांदा ब्लास्ट :

कोरपना – भोगवटदार वर्ग दोन ची जमीन भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतर करून देण्याच्या कामासाठी वरिष्ठांच्या नावाने दोन हजार रुपयाच्या लाचेची मागणी करणाऱ्या कोतवालाला पडताळणी नंतर अटक केल्याची कारवाई बुधवारी कोरपना येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

कोरपना येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या मुलाची भोगवटदार दोन मध्ये असलेली शेत जमीन  भोगावटदार एक मध्ये करायची होती. या कामासाठी पारडी तलाठी साजाचे कोतवाल संजय कुळमेथे यांनी तक्रारदारांना वरिष्ठ चे नाव सांगून दोन हजार रुपयाची मागणी केली. परंतु तक्रारदारांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले व कर्मचाऱ्यांनी कोरपना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करीत अटक केली.

सदर कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर , अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूरच्या  पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरणुले , पोलीस कर्मचारी रोशन चांदेकर नरेश ननावरे, संदेश वाघमारे ,सतीश सिडाम यांनी केली. भोसले या चंद्रपूर येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी महिनाभराच्या आत ही पहिली कारवाई केली आहे. या कारवाईने लाच घेणाऱ्यांची धाबे दणाणले गेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये