ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांचे दीर्घ आजाराने निधन

त्यांच्या जाण्याने मनसे पक्षाची फार मोठी हानी...

चांदा ब्लास्ट

     चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष व मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार यांचं २२ ऑक्टोबरला दीर्घ आजाराने निधन झाले.

आज सकाळी १० वाजे दरम्यान मनसे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार यांचे दुःखद निधन झाले. मनसेच्या वाढीसाठी यांनी सतत प्रयत्न केले. दिलीप यांचे स्वभाव शांत सरळ असून त्यांनी सर्व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन कार्य केलेत.

राजकारणात अनेक वर्षे कार्यरत दिलीप रामेडवार यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करीत न्याय दिला, मध्यंतरी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी राजकारणातून विश्रांती घेतली होती. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.

२२ ऑक्टोबरला विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील राहत्या घरी अतिंम श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मनसे पक्षाची फार मोठी हानी झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये