ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतले जिल्हा कारागृहातील गैबीशाह वली समाधी स्थळाचे दर्शन

चांदा ब्लास्ट

मोहरम निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा कारागृहातील गैबीशाह वली समाधी स्थळाचे दर्शन घेत चादर चढवीली. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधिक्षक अनुपकुमार कुमरे, रमजान अली घायल, यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, युवा नेता ताहीर हुसेन यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

      मोहरम निमित्त आज जिल्हा कारागृहातील दार भाविकांसाठी उघडे करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी कारागृहात असलेल्या गैबीशाह वली समाधी स्थळाचे दर्शन घेतले. चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनीही यावेळी जिल्हा कारागृहात भेट देत गैबीशाह वली समाधी स्थळाचे दर्शन घेत गैबीशाह वली यांच्या समाधी स्थळावर चादर अर्पण केली. यावेळी कारागृह दरगाह कमेटीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत करण्यात आले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये