कोरपना येथे ‘माँ शक्ती गरबा महोत्सवा’चे आयोजन
दांडिया स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना : नवरात्रोत्सवानिमित्त कोरपना येथे ‘माँ शक्ती गरबा महोत्सव व दांडिया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तसेच भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्यालय, कोरपना यांच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
दि. १३ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात गरबा स्पर्धा, ‘प्रिन्सेस ऑफ दांडिया’ स्पर्धा, बाल गट तसेच दैनंदिन बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांसाठी आकर्षक पारितोषिके व भेटवस्तू ठेवण्यात आली आहेत.
या महोत्सवाच्या माध्यमातून महिला, युवती आणि बालकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार असून, नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिक वाढणार आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
📍 कार्यक्रमाचे स्थळ : मकसूद पारेख यांचे गोदाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तहसील रोड, कोरपना.
📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
– अलका रणदिवे : 9049501137
– सौ. संगीता चितलवार : 9075219358
– गीता डोहे : 9673142406
– सौ. वर्षा लांडगे: 8459651259
– सौ. मनीषा मालेकर : 7625807873
– सौ. सोनाली आसेकर : 9356313449
– सौ. हर्षा ईटनकर : 7823081359
– सौ. वैशाली बोंडे : 9765703516
गरबा व दांडिया स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी वरील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधून नोंदणीसंदर्भात माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



