ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुकाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

क्रियांश जि-चॅम्प अबॅकस देऊळगाव राजा सेंटरला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील क्रियांश जि-चॅम्प अबॅकस सेंटरला शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जागतिक स्तरावरील मानाचा ‘इंटरनॅशनल सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ (International Certificate of Excellence) पुरस्कार मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ‘एक्स्प्रेस इन हेरिटेज’ हॉटेलमध्ये आयोजित भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 आमदार विलास संदीपान भूमरे यांच्या शुभहस्ते.

क्रियांश जि-चॅम्प अबॅकस देऊळगाव राजा सेंटरचे संचालक आदित्य शिंदे आणि संचालिका प्रतिक्षा शिंदे (पवार) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

जि-चॅम्पचे मॅनेजिंग डायरेक्टर योगेश देशमाने सर, आरती देशमाने मॅडम आणि अनिकेत तुपकरी सर. यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

देऊळगाव राजा परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये गणितीय कौशल्ये आणि बौद्धिक विकास घडवून आणणाऱ्या क्रियांश जि-चॅम्प अबॅकस सेंटरचे आणि संपूर्ण टीमवर शुभेच्छाचां वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये