ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आय 20 होन्डाई कारमध्ये बकरी चोरी करणारे चोरास रामनगर पोलीसांनी 24 तासात ठोकल्या बेडया

श्री दिनेश कांबळे पोलीस उपनिरीक्षक व रामनगर येथील डि. बी. उत्कृष्ट कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 04.10.2026 रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथे फिर्यादी नामे संजय शंकरराव ठाकरे रा. तुकाराम वार्ड वर्धा यानी तकार दिली की त्यांचेकडे असलेल्या 20 ते 25 बक-या त्यांची आई दिनांक 03.10.2026 रोजी सुखकर्ता नगर रामनगर वर्धा येथे चारण्याकरीत घेवुन गेली असता त्यांना दुपारी 12.00 वाजता तहान लागल्याने त्या जवळच्या मंदिरामध्ये पाणी पिण्याकरीता गेल्या व काही वेळ आरात केला त्याच दरम्याण एक फोरव्हिलर गाडीमध्ये चरणाऱ्या बकऱ्या पैकी एक पांढऱ्या रंगाचा बोकड एक लाल रंगाचा बोकड व दोन बकऱ्या फिर्यादीचे आईला दिसुन आल्या नाही म्हणुन त्यानी आजुबाजुला शोध घेतला पंरतु बकऱ्या मिळुन आल्या नाही म्हणुन त्यानी फिर्यादी याना घरी येवुन दोन बोकड व दोन बकऱ्या कुठे गेल्या दिसुन येत नाही असे सांगीतले असता.,

फिर्यादी व त्यांचा लहान भाऊ यांनी सदर बोकड व बकऱ्या यांचा सुखकर्ती नगर व आजुबाजुचे परीसरामध्ये शोध घेतला मिळुन आल्या नाही त्यानंतर दिनांक 04.10.2026 रोजी बकऱ्याचा फिर्यादी शोध घेत असता त्याना परीसरातील लोकांनी सांगीतले की दिनांक 03.10.2026 चे दुपारी 12.30 वाजताचे दरम्याण एक सिल्वर रंगाची चारचाकी गाडी एक पांढऱ्या रंगाचा बोकड अंदाजे किमत 10000/रू, एक लाल रंगाचा बोकड किमत 8000/रू व दोन बकऱ्या किमत 14000/रू असा एकुण 32000/रू अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होताच रामनगर गुन्हेप्रगटीकरण पथकाने तपासाचे चके फिरवित टोलनाका चेक करत गाडीचा शोध घेवुन आरोपी तांडापेठ कलकत्ता रेल्वे लाईन पाचपावली पोलीस स्टेशनचे हदिमधुन ताब्यात घेवुन गुन्हयात वापरलेली कार क एम एच 31 डि के 5596 किमत 300000/रू व शेळया विकुन आलेल्या पैशा पैकी अंगझडतीत नगदी 15000/रू असा मुदेमाल आरोपी नामे नितीन माहुरे रा. तांडापेठ कलकत्ता रेल्वे लाईन नागपुर याचे ताब्यातुन जप्त केले पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल वर्धा,अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामनगर येथील पोलीस निरीक्षक पोर्णीमा राखुंडे मॅडम पोउपनि दिनेश कांबळे अमलदार, कैलास वालदे, विशाल देवकते, गजानन मस्के, प्रसाद शिंदे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये