ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसविरांनी केले संभाजी भिडे यांच्या पुतळ्याचे दहन

आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल केली भिडे यांच्या अटकेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संजय पडोळे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे  बद्दल अवमानकारक वक्तव्य करून प्रक्षोभक विधानाने सामाजिक एकोपा भंग करू पाहणाऱ्या संभाजी भिडे यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यासाठी तालुका व शहर काँग्रेस पार्टीच्या वतीने भिडे यांच्या प्रतिमेला जोडो मारत निषेध करण्यात आला.
 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात संभाजी भिडे यांच्या  निषेधाचे फलक हाती घेत निदर्शने करण्यात आले. संभाजी भिडेचे करायचे काय ? खाली डोक वरती पाय म्हणत भिडे विरूध्द घोषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरू गुरनुले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस गुरू चौधरी, बाजार समिती सभापती राकेश रत्नावार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते बंडु गुरनुले यांनी भिडे यांच्या आक्षेपार्ह विधानावर मत व्यक्त करतांना जाहीर निषेध नोंदविला. यावेळी उपस्थित महीला काँग्रेसच्या पदाधिका-यांनी संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला जोडो मारत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
 यावेळी ठाणेदार सुमित परतेकी यांची भेट घेत संभाजी भिडे यांचेविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार, महिला शहर अध्यक्ष नलीनी आडेपवार, बाजार समितीचे संचालक संदीप कारमवार, हसन वाढई, माजी नगर सेवक विनोद कामडे, लिना फुलझेले, सरपंच रविंद्र कामडे, प्रा, विजय लोनबले, डाँ. पदमाकर लेनगुरे, शामला बेलसरे, वैशाली काळे, उमा बेलसरे, कैलास चलाख, विवेक मुत्यलवार, विष्णु सादमवार, ईश्वर लोनबले, निलेश माथनकर, आकाश दहीवले, सुरेश फुलझेले, संदीप मोहबे, अतुल जेंगठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये