ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संभाजी भिडे यांचेवर गुन्हा नोंद करा

वर्धा शहर आम आदमी पार्टीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज वर्धा पोलिस ठाण्यात जावुन एका निवेद नातू न आम आदमी पार्टी वर्धा शहर यांनी संभाजी भिडे यांचे वर गुन्हा नोंद करुन अटक करण्याची मागणी केली

संभाजी भिडे यांनी या अगोदर सुद्धया अशी वादग्रस्त विधाने केली आहे. त्या मुळे सामाजिक तेढ निर्माण होवू शकते.

काल अमरावती येथे सभेत अशे च वादग्रस्त विधान महात्मा गांधी यांचे बद्दल केले .एका महान विभूती चा हा अपमान आहे .गांधी हे देशाचे नव्हे तर संपुर्ण जगाचे श्रध्दास्थान आहे .आम्ही गांधी जिल्हात राहतो याचा आम्हाला अभिमान आहे .सदर वादग्रस्त विधान केल्याने संपुर्ण देश वसियांच्या भावना आहात झाल्या असुन त्यांचेवर भा.द वी .153 कलम अन्तर्गत गुन्हा दाखल करावा.
अशी मागणी वर्धा आम आदमी पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे.

वर्धा पो.स्टे.मध्ये निवेदन देताना जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले शहर प्रमुख मंगेश शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष दुर्गा प्रसाद मेहरे किरण पारिसे,बलराज गुप्ता अमर शेंडे,शरद पुरोहित, प्रकाश भोयर,अस्लम पठाण शाह रुख पठाण, आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये