ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना ठाकरे गटांकडून गरजूंना साहित्य वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून पूरपरिस्थीती निर्माण झाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून गरजूंना घर उपयोगी साहित्याचा वाटप करण्यात आला . उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा कार्यक्रम न घेता शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात युवा सेना उपजिल्हाप्रमुख महेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात ग्रामीण रुग्णालय येथे व्हीलचेअर वाटप करण्यात आली त्यानंतर पूरबाधित गावाचा दौरा करून गरजूंना घर उपयोगी साहित्याचा वाटप करण्यात आला.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मनीष जेठानी, अमित निब्रट, रमेश मेश्राम, संदीप मेश्राम, दिनेश यादव, विपिन काकडे, कीर्ती पांडे, ओंकार लोंढे, अक्षय झिले आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये