बरबडी गावात पंकज सोनटक्के यांच्या शेतातील साहित्य जाळून दिड लाखाचे केले नुकसान
निकेश परचाके पटवारी व विजय झाडे मंडळ अधिकारी यांनी शेतात जाऊन पाहणी केली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील बरबडी गावात शेतातील शेती उपयोगी साहित्य तसेच जमा करून ठेवलेला गहू जाळून टाकल्याची घटना घडली आहे.या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार शेतमालक पंकज मोतीरामजी सोनटक्के राहणार बरबडी तहसील वर्धा, जिल्हा वर्धा यांच्या शेतात दिनांक 26 मे 2026 रोजी रात्रीच्या दरम्यान दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अज्ञातांनी शेतातील फवारणी पंप पाच पंधरा पाईप दहा पोती रासायनिक खत रासायनिक विषारी औषधे पंधरा डब्बे गुरांच्या चारा तसेच गहू जाळून टाकल्याची घटना घडली आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून बरबडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या संबंधित या प्रकरणाची चौकशी करिता तहसील कार्यालय वर्धा येथील तहसीलदार संदिप पुंडेकर यांच्या आदेशानुसार विजय झाडे मंडळ अधिकारी बरबडी आणि निकेश परचाके पटवारी बरबडी यांनी चौकशी करून चौकशी अहवाल तहसीलदार वर्धा यांच्या कडे पाठविण्यात आले आहे….



