ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा शहरातील आंबेडकर चौक परिसरात फुटपाथवर उभारण्यात आलेल्या दुकानांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

निर्माण होत असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून, दररोज हजारो नागरिकांची येणे -जाणे सुरू असते.

या चौकाच्या परिसरात विविध शासकीय कार्यालये असल्यामुळे नागरिकांची सतत गर्दी असते. मात्र फुटपाथ आणि रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या दुकानांमुळे रस्ते अरुंद झाले असून वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा सहन करावा लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, या ठिकाणी अतिक्रमण वाढत असताना संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. “या दुकानधारकांवर कोणाचा आशीर्वाद आहे?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

तसेच या गर्दीच्या परिसरात एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न उपस्थित होत असून पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. विशेषतः वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये