ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रघुवंशी कॉम्प्लेक्स ते हिंदी सिटी हायस्कुल शाळेपर्यंतचा रस्ता तात्पुरता बंद

नाल्याचे बांधकाम सुरू

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ महानगरपालिका बांधकाम विभागामार्फत हिंदी सिटी हायस्कुल शाळेलगतच्या नाल्याच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात आले असून सदर काम सुरू झाले आहे. या कामामुळे रघुवंशी कॉम्प्लेक्स ते सिटी सेकंडरी शाळेपर्यंतचा रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

  येत्या पावसाळ्यात परिसरात पाणी साचणे, अतिप्रवाहाची समस्या निर्माण होणे तसेच नागरिकांना होणारा संभाव्य त्रास टाळण्यासाठी हे बांधकाम करण्यात येत आहे. काम सुरक्षित व सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी संबंधित मार्गावरील वाहनांची रहदारी बंद ठेवणे आवश्यक असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

   सदर नाला हा असुन वरील स्लॅप खचत असल्याने त्याचे बांधकाम करणे गरजेचे होते. सदर कामास सुमारे ३० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सदर बांधकाम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये