उपरवाही येथे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाच्या आदिवासी बहुल तालुक्याचा आढावा.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्रात आरोग्य सेवा चे सशक्तीकरण तसेच चालू वर्षांमध्ये सर्व आरोग्य विषयक निर्देशांकामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने दिनांक 20 मे रोजी आदिवासी बहुल , अतिदुर्गम,डोंगराळ जिवती राजुरा व कोरपणा तालुक्यातील आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तालुकास्तरीय आढावा सभा मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे सर यांच्या अध्यक्षतेखाली अंबुजा फाउंडेशन कार्यालय उपरवाही येथे पार पडली.
सदर सभेमध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचा आढावा वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र डॉ. माधुरी टोंगे यांनी घेतला तर राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत हिवताप व हत्तीरोग या विषयांचा आढावा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ प्रकाश साठे सर, राष्ट्रीय कुष्ठरोग दुरीकरण कार्यक्रमाचा आढावा डॉ कांचन टेंभुर्णे मॅडम ,तसेच माता बाल संगोपन , लसीकरण गरोदर माता नोंदणी अति जोखमीच्या मातांची तपासणी, सिकल सेल आजार अधिकारी डॉ. मनोज गिरी सर यांनी माता व बालसंगोपन विषयाचा आढावा, तसेच साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर भट्टाचार्य यांनी सात रोग विषयक आढावा घेतला. ,सोबत राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ.पद्मजा बोरकर मॅडम, टेली कन्सल्टेशन समन्वयक श्री दीपक, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना विभागीय समन्वयक डॉ.रुपेश कुमारवार सुद्धा उपस्थित होते.
यावेळी सर्व आरोग्य विषयक कार्यक्रमांचा आढावा मा.जिल्हा आरोग्य अधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. सदर सभेचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी कोरपणा व जिवती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल टेंभे तथा तालुका आरोग्य अधिकारी राजुरा डॉ. प्रकाश नगराळे यांनी केले होते. सदर सभेला कोरपणा जिवती व राजुरा तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक स्त्री आरोग्य सहाय्यक पुरुष तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कोरपणा, जिवती व राजुरा येथील सर्व आरोग्य विषयक विभागांचे समन्वयक उपस्थित होते.



