ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ शहरातील गौतम नगर परिसरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवार दिनांक ६ रोजी घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गौतम नगर येथे राहणारे शिवनाथ कृष्णा वाघमारे यांची १३ वर्षीय मुलगी घरात असताना कुणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेले. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र मुलगी आढळून न आल्याने त्यांनी भद्रावती पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून मुलीचा शोध सुरू केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून पोलिस विविध दिशेने तपास करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये