ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’

भद्रावती तालुक्यात १४ ग्रामपंचायतींच्या कामाचे मूल्यांकन सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत भद्रावती तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या कामकाजाची प्रत्यक्ष पडताळणी आणि मूल्यांकन तपासणी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

शासनाच्या 6 आगस्ट 25 च्या शासन निर्णयानुसार 17 सप्टेंबर 25 पासून राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानासाठी विविध जिल्ह्यांतील तज्ज्ञ पथकांमार्फत तपासणी केली जात आहे. भद्रावती तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतींच्या मूल्यमापन तपासणीसाठी पंचायत समिती अर्धापूर,जिल्ह्य नांदेड येथील गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी पथक दाखल झाले असून समितीमध्ये विस्तार अधिकारी पांडुरंग गर्जे, आरोग्य विस्तार अधिकारी एस.पी. गोखले, ग्रामपंचायत अधिकारी डी.व्ही. देशमुख, पत्रकार गोविंद टेकाळे या सदस्यांचा समावेश आहे.

        १४ ग्रामपंचायतींचे होणार मूल्यांकन…

अभियानांतर्गत सागरा, चालबर्डी रै, नंदोरी बु., आष्टा, चंदनखेडा, ढोरवासा, पारोधी, शेगाव खु., नागलोन, जेना, मुधोली, भामडेळी, घोटनिंबाळा आणि टेकाडी (दी). या ग्रामपंचायतींच्या कामाची तपासणी केली जात आहे. या प्रक्रियेत भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ,प्रभारी गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार,पंचायत विस्तार अधिकारी प्रणाली भागवत, प्रमोद ढोरे,कृषी अधिकारी महेंद्र डाखरे,ग्रामपंचायत अधिकारी विनोद झिले आणि रमाकांत गुरनुले यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

बक्षिसांचा वर्षाव, राज्यस्तरावर ५ कोटींचे पारितोषिक

ग्रामपंचायतींनी केलेल्या विकासकामांच्या आधारे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने भरघोस बक्षिसे जाहीर केली आहेत. यामध्ये तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत स्पर्धा होणार आहे. राज्यस्तर प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी, त्रितीय २ कोटी, विभागस्तर प्रथम १ कोटी, द्वितीय ८० लाख रुपये, त्रितीय ६० लाख, जिल्हा स्तर प्रथम ५० लाख रुपये,द्वितीय ३० लाख, त्रितीय २० लाख, तालुका स्तर प्रथम १५, द्वितीय १२ लाख, त्रितीय ८ लाख आणि दोन विशेष प्रोत्साहन पर, या अभियानामुळे ग्रामपंचायतींमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ग्रामीण विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये