ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशवंत विद्यालय हिंगणीचा दहावीचा निकाल ८२.१४ टक्के…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हिंगणी : यशवंत विद्यालय हिंगणी येथे एस.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी-मार्च सत्र २०२५-२०२६ मध्ये शाळेचा निकाल ८२.१४ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

शाळेतून कु. मेहेक जितेंद्र कमडी हिने ५०० पैकी ३६९ गुण मिळवत ७३.८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तर कु. रितिका संजय दुर्गे हिने ५०० पैकी ३६८ गुण मिळवत ७३.६ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच मेहुल सुरेश सातघरे याने ५०० पैकी ३६७ गुण मिळवत ७३.४ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. समीर भाऊ देशमुख, जनरल सेक्रेटरी डॉ. किशोरराव अहेरे, मुख्याध्यापक श्री. नंदकिशोर ठाकरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व गावातील मान्यवरांनी केले. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये