भद्रावती येथे श्री गुरूदेव प्रार्थना मंदिर उद्घाटन व श्री गणेश मंदिर जिर्णोद्धार सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील भोजवार्ड येथे श्री गुरूदेव प्रार्थना मंदिराचे उद्घाटन तसेच श्री गणेश मंदिराच्या जिर्णोद्धाराचा भव्य सोहळा सोमवारी व मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सोमवारी पहाटे ५.२० वाजता श्री गुरूदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती, राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, गुरुकुंज मोझरीचे आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या हस्ते श्री गुरूदेव प्रार्थना मंदिराचे उद्घाटन झाले. यानंतर श्रीगणेश व प्रभू श्रीराम दरबाराचे पूजन करण्यात आले. आहे. त्यानंतर सामुदायिक ध्यान-चिंतन कार्यक्रम संपन्न झाला .
सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत शहरातील भोजवार्ड परिसरातून रामधुन काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी घरासमोर स्वच्छता, सजावट, रांगोळी तसेच संत-महापुरुषांचे व देवी-देवतांचे फोटो ठेवले होते.
सकाळी ८.३० वाजता मार्गदर्शन कार्यक्रमात श्री गुरुदेव प्रचारक गुणवंतदादा कुत्तरमारे व विशालदादा गावंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार करण देवतळे, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, केशवानंद मेश्राम महाराज यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
सायंकाळी सामुदायिक प्रार्थना, चिंतन तसेच रात्री राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रम ह.भ.प. आकाश महाराज ताविडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
मंगळवारी सकाळी सामुदायिक ध्यान-चिंतनाचा कार्यक्रम रविश मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यानंतर कीर्तन व गोपालकाला ह.भ.प. पुंडलिकजी गाडगे महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व मार्गदर्शनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
हा सोहळा श्री गुरूदेव प्रार्थना व श्री गणेश मंदिर देवस्थान समिती, भोजवार्ड तसेच समस्त भोजवार्ड नगरवासीयांच्या वतीने आयोजित करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष कवासे गुरुजी, उपाध्यक्ष निलेश कुमरे, सचिव खुशाल कंचनवार, कोषाध्यक्ष रामू गेडाम, सदस्य रामकृष्ण कुबडे, श्रीराम नागपुरे, सोमाजी सलामे, मधुकर बुरान, संजय कोवे, गणेश भडके, नाना चटपल्लीवार, कैलास नागपुरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.



