ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांतीचा अंशू कोटरंगे ठरला ओबीसी प्रवर्गातून तालुक्यातून पहिला

विश्वशांती विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली :_ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचालित विश्वशांती विद्यालय सावली येथील अंशू संतोष कोटरंगे याने वर्ग १० वीच्या परीक्षेत ४६१(९२.२० टक्के) गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आणि *ओबीसी प्रवर्गातून* पहिला येण्याचा बहुमान मिळवला आहे. ओबीसी प्रवर्गातून पहिला आल्याने सावली तालुक्यात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विश्वशांती विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

ओबीसी प्रवर्गातून पहिला आलेल्या अंशू कोटरंगे याचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार ,सचिव राजाबाळ पाटील संगीडवार,सर्व पदाधिकारी तथा सदस्य , विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक राजेश झोडे, विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये