ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा चंद्रपूर महानगरच्या वतीने चंद्रपूरात भाजपचा विजय जल्लोष उत्साहात संपन्न

फटाक्यांची आतिषबाजी, लाडू वाटप

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ आसाम, पश्चिम बंगाल व पुडुचेरी येथे भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात आयोजित जल्लोष कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने गांधी चौक येथे हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

    यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुविर अहिर, महामंत्री मनोज पाल, श्याम कनकम, नामदेव डाहुले, सविता दंढारे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, तुषार सोम, दशरथ सिंग ठाकूर, बलराम डोडाणी, सुधीर कारंगल, अमोल शेंडे, महिला महामंत्री सायली येरणे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर वाढई, अनुसूचित जमाती अध्यक्ष तथा नगरसेवक जितेश कुळमेथे, गटनेता शेखर शेट्टी, नगरसेवक संजय कंचर्लावार, भालचंद्र दानव, नितेश गवळी, नगरसेविका अनुजा तायडे, आशा देशमूख, सारिका संदुरकर, मजुश्री कासनगोट्टूवार, अनुसूचित जाती अध्यक्ष विमलताई कातकर, विनोद शेडकी, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे अल्पसंख्यांक अध्यक्ष राशीद हुसेन, कौसर खान, सुजाता कापसे, कामगार झोपडपट्टी अध्यक्ष रामकुमार अकापल्लीवार, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, प्रलश मशाखत्री, प्रमोद शास्त्रकार, प्रविण गिलबिले, सतीश तायडे, भाजप नेते शिरीष गोगलवार, सागर बोरेवार, भाग्येश्री हांडेे, सुमित बेले, प्रतिक शिवणकर, कार्तीक बोरेवार, राकेश नाकाडे, बबलु मेश्राम, ईश्वर वाघमारे, रेषमा पांडे विनोद पेंडलीवार, सुरेंद्र अंचल, आदींची उपस्थिती होती.

      यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतीषबाजी करत तसेच लड्डू वाटप करून कार्यकर्ते व समर्थकांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेला होता.

पक्षाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल एकमेकांचे अभिनंदन करत सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. एकूणच, भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा हा जल्लोष चंद्रपूरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या महानगर कार्यालयात घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाला शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये