ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भूज गावाकरिता तत्काळ नवीन डी. पी बसवून गावाचा वीजपुरवठा सुरळीत करा

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री. तनय दादा देशकर यांची महावितरण विभागाकडे आग्रही मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :_ तालुक्यातील भुज गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्काळ नवीन डी.पी. (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर) बसवण्यात यावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्री. तनय दादा देशकर यांनी महावितरणकडे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात सहाय्यक अभियंता, महावितरण (MSEB) यांची भेट घेत श्री. तनय दादा देशकर यांनी चर्चा केली. या बाबतचे निवेदन ही श्री. तनय दादा देशकर यावेळी दिले.

भुज गावा करिता असलेली डी.पी. दिनांक ४ मे रोजी रात्री अचानक जळून निकामी झाला. परिणामी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे नागरिकांना पूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. विशेष म्हणजे सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिकच तीव्र झाली असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

समस्येची तत्काळ दखल घेत श्री. देशकर यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी अधिकाऱ्यांसोबत बोलतांना श्री. तनय दादा देशकर यांनी सांगितले की, भुज गावासाठी नवीन डी.पी. बसविणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे गावातील वीजपुरवठा सुरळीत होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच, येणाऱ्या काळात अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठीही आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली.

या प्रसंगी भाजपाचे तालुका महामंत्री तथा माजी सभापती प्रा. रामलालजी दोनाडकर, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. अविनाशजी मस्के, जेष्ठ नेते श्री. घनशामजी तोमटी, भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री. भुजंगजी राऊत, तालुका सचिव श्री. अभयजी कुथे, भुज येथील श्री. लक्ष्मणजी लेंझे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये