अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 05/05/2026 रोजी सकाळी 08/00 वा. चे सुमारास क्षीधर कडु यांचे सायकलचे दुकाणचे बाजुला निंबाचे झाडा खाली आरती चौक वर्धा येथे एक अज्ञात इसम वय अंदाजे 55 वर्ष हा पडुन दिसला त्यांनी प्रतीसाद न दिल्याने श्रीधर महादेवराव कडु रा साटोडा ता जि वर्धा यांनी डायल 112 वर कॉल करुन माहिती दिल्याने दोन पोलीस घटनास्थळी जावुन पाहिले असता एक अनओळखी ईसम अंदाजे वय 55 वर्ष हा मृत अवस्थेत पडुन दिसला होता. सदर घटनास्थळ पंचनामा कार्यवाही करुन सदर इसमाचे प्रेत सा.रु.वर्धा येथे पिएम करण्याकरिता शव गृह मध्ये ठेवलेले आहे. फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो,स्टे, वर्धा श योथे मर्ग क्र 29/2026 कलम 194 BNSS. अन्वये नोंद आहे. तरी त्याच्या नातेवाईकाचा शोध घेण्याकरिता व सदर इसमाचे ओळख पटविण्याकरिता आवाहन..
सदर अनोळखी मृतक ईसम वय अंदाजे 55 वर्ष वयोगटातील आहे त्याची ओळख पटवण्याकरिता सदर मृतक ची बातमी प्रसारण होण्याकरिता व सदर मर्ग चा तपास पोउपनि गितांजली गारगोटे पो. स्टे, वर्धा शहर हे करत आहे. सदर ईसमाची ओळख पटल्यास पोलीस स्टेशन वर्धा श येथे कळवावे.
मृतकचे वर्णन – एक अनोळखी इसम वय अंदाजे 55 वर्ष (पुरुष) रंग सावळा, उंची 5 फुट 4 इंच, चेहरा – लंबोरा, केस – पांढरे, दाढी बारीक (पांढरी), कमरेला पंचरंगी करदुडा बाधलेला, पायात चप्पल नाही अंगात पांढ-या रंगाचे निळ्या टींपक्याचे असलेला फुल बाहीचा शर्ट, राखडी रंगाचा फुल पँन्ट, व त्या खाली कच्या रंगाची अंडरवेअर घातलेला आहे.



