पो.स्टे. सेवाग्राम पोलीसाकडुन घरफोडीचा गुन्हा उघड
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
फिर्यादी नामे रमेश संभाजी वाटगुळे वय 50 वर्ष रा. धानोरा ता. जि. वर्धा यांचे तक्रारी वरुन पोलीस स्टेशनला अप क. 222 / 2026 कलम 331 (4), 305 (A), बीएनएस अन्वये गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयात फिर्यादी यांचे राहते घराचे दरवाज्याचे कडी कोंडा तोडुन अज्ञात इसमाने आत प्रवेश करुन आलमारीचे लॉकर मधील 1 ) नगदी 12,000 / रु 2 ) सोन्याची अंगठी 3 ) चांदिच्या तोरडया असा एकुण जु. किं 19,000 / रु चा माल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.
सदर गुन्हयाचा तपास दरम्याण मिळालेल्या माहितीवरुन आरोपी नामे विनोद सुरेश गुरनुले वय 34 वर्ष रा. सालईधाभा ता. हिंगणा जिल्हा नागपूर, ह.मु. धानोरा ता. जि. वर्धा. यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी एक पिवळया धातुची अंगठी 2 ) चांदीच्या तोरडया किंमत 2000 /रु व 3) नगदी 3000 /रु असा जु. किं 5000 / रु चा माल मिळुन आल्याने जप्ती पत्रकाप्रमाणे जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल सा, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे सा, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर सा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर ठाणेदार पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार संजय लाडे, हरिदास काकड, स्वप्नील मोरे, धीरज मिसाळ, प्रदिप कुचनकर सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम यांनी केली.



