वर्धा जिल्ह्यातून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक – कु. मिस्बा नियाजी फातिमा यशस्वी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : इयत्ता १२ वी (HSC) परीक्षा २०२६ च्या निकालात वर्धा जिल्ह्यातील कु. मिस्बा नियाजी फातिमा हिने विज्ञान शाखेत उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने ९५.६७ टक्के गुण मिळवत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
इुतामा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाची ही गुणवंत विद्यार्थिनी असून तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे.
तिच्या यशामध्ये पालकांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि स्वतःची मेहनत यांचा मोठा वाटा असल्याचे तिने सांगितले. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी काहीतरी करण्याचा तिचा मानस आहे.
कु. मिस्बा नियाजी फातिमा हिच्या या यशामुळे इुतामा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय तसेच संपूर्ण वर्धा जिल्ह्याचा गौरव वाढला असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



