दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम
विज्ञान शाखेचा 97.82 टक्के निकाल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू :- तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या येथील दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल तब्बल 97.82 टक्के लागल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या निकालात कु. लक्ष्मी रविंद्र तडस हिने 77.17 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कु. लावण्या गजानन रघाटाटे हिने 76.67 टक्के गुण मिळवत द्वितीय, तर कु. संजीवनी संजय वांदिले हिने 72.50 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या यशात मानाचा तुरा खोवला.
या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना मकरंदे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पर्यवेक्षक जी. बी. खंडागळे व मुंडे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या यशामागे विभाग प्रमुख प्रा. मंगेश वडूरकर यांच्यासह प्रा. मेघा चंद्रनखेडे, प्रा. राजेश कनोजिया, प्रा. राजेश गोर, प्रा. जे. एम. डायगव्हाने व प्रयोगशाळा सहाय्यक बुधे यांच्या मार्गदर्शनाची मोठी भूमिका राहिल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिक्षकांचे परिश्रम, विद्यार्थ्यांची जिद्द आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.



