ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धाबाच्या नव्या ठाणेदाराची एकाच आठवड्यात दुसरी यशस्वी कामगिरी

हरविलेले सात मोबाईल महाराष्ट्र दिनी मूळ मालकांना परत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

धाबा पोलिस स्टेशन अंतर्गत परिसरातील मागील एक वर्षापासून हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकांना परत करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण सात मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत. विशेष म्हणजे, धाबा पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले ठाणेदार सपोनी सुबोध वंजारी यांची एकाच आठवड्यातील ही दुसरी यशस्वी कामगिरी असल्याने त्यांच्या “धडाकेबाज एन्ट्री”ने परिसरातील अवैध्य धंद्यांवर वचक बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४_२५ ते २०२५_२६ च्या दरम्यान धाबा परिसरातील एकूण सात मोबाईल मालकांनी आपले मोबाईल हरविल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. त्यानुसार, हरविलेल्या मोबाईलचा CEIR PORTAL द्वारे माहिती प्राप्त करून तेलंगणा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात शोध घेऊन मोबाईल मिळविण्यात यश आले. धाबा पोलिसांनी शोधून काढलेले मोबाईल मुळ मालकांना आज (१ मे) महाराष्ट्रदिनी पोलीस स्टेशन येथे सुव्यवस्थिपने परत करण्यात आले.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन धाबाचे प्रभारी ठाणेदार सपोनी सुबोध वंजारी, पोलीस हवालदार विजय मडावी, अमित गुरनूले, मासूम मेश्राम, धनराज सयाम, श्रावण कुत्तरमारे, रामेश्वर पाल, गजानन तुरेकर, अमित देठे आणि प्यारेलाल देव्हारे यांनी पार पाडली.

 मूळ मालकांना परत करण्यात आलेले एकूण सात मोबाईल हे infinix, vivo, oppo, tecno spark या कंपनीचे असून, त्यांची किंमत अंदाजे १ लाख रुपये आहे. मोबाईल परत मिळाल्याने जितेंद्र पेरगुरवार (चेक नांदगाव), रितेश सीडाम (धाबा), अरुण कावळे (सुकवासी), रितेश उईके (कोळसा, चंद्रपूर), शाहू लिंगे (किरमिरी), मधुकर डोंगरे (चेक सोमनपल्ली), विजय गोहणे (धाबा) यांनी धाबा पोलिसांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये