महाराष्ट्र दिन निमित्ताने सनराईज योगा ग्रुपच्या वतीने समाजप्रबोधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सनराईज योगा ऍक्टविटी बेनिफिट वूमन्स ग्रुप गडचांदूर च्या वतीने महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा हा त्रिवेणी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. योगाच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक व प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली तसेच राष्ट्रगीत सादर करून देशभक्तीची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी कामगार दिन व बुद्ध पौर्णिमे निमित्त समाज प्रबोधनपर विचार मांडण्यात आले.
सनराईज योगा ग्रुपच्या संचालिका कुंतल चौहान यांनी महिलांना आरोग्य, शिस्त व एकता यांचे महत्त्व पटवून दिले ,तसेच योगाच्या माध्यमातून निरोगी जीवन शैली अंगीकारण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात सौ. कृष्णा ठाकरे सौ. सुरेखा ठाकरे सौ उज्वला शेरकी, सौ माया धाबेकर , सौ अंजू विश्वास, सौ पल्लवी इंगोले, पल्लवी रोहणे, सौ शोभा मोहुर्ले , शिला येटे , सौ मंदाताई वडस्कर, सौ स्वाती झाडे, सौ मंगला खामनकर अनिता केराम, सौ भारती राठोड,सरोज मडावी, माधुरी सातपुते, सौ. रंजना पवार, सौ अर्चना ठाकरे सौ.छाया टोंगे सौ पारखी या सर्व महिला सदस्य उत्साहाने सहभागी झाल्या सनराईज योगा ग्रुप तर्फे दररोज सकाळी नियमित योगा वर्ग घेतले जातात. या माध्यमातून महिलांना विविध प्रकारचे योगासन शिकवून त्यांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनवले जाते तसेच सतत मोटिवेशन दिले जाते.विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात जागतिक आरोग्य दिन, जागतिक कला दिन, जागतिक जज दिन, जागतिक नृत्य दिन तसेच जागतिक पुस्तकं दिन,जागतिक पृथ्वी पर्यावरण दिन जागतिक मलेरिया, दिन जागतिक पंचायत दिवस,जागतिक बौद्धिक संपदा दिन अशा विविध दिवसांचे आयोजन करून प्रत्येक दिवस योगाच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. या उप क्रमामुळे महिलांमध्ये जागरूकता, उत्साह व आत्मविश्वास वाढत आहे.
सनराईज योगा ग्रुप हे 2022 पासून सातत्याने कार्यरत असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे.



