वर्धा जिल्हा पोलीस दलातील ५ वरिष्ठ अंमलदारांना भावपूर्ण निरोप
पोलीस अधीक्षक महोदयांच्या हस्ते गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस दलात प्रदीर्घ काळ आपली सेवा बजावून वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या ५ वरिष्ठ पोलीस अंमलदारांचा निरोप समारंभ आज पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे अत्यंत उत्साहात पार पडला. माननीय पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आहेत: आज दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे
०१ श्रेणी पोउपनि ३२९ माणिक गोरखनाथ नगराळे पो. स्टे हिंगणघाट
२२ श्रेणी पोउपनि ५९५ नरेश लक्ष्मणराव पेटकर, पो. मु वर्धा
०३ श्रेणी पोउपनि १०४८ मनोहर रामदासजी चांदेकर, पो. मु वर्धा
०४ सफी/०२ संजय मधुकरराव ठोंबरे, दहशतवाद विरोधी पथक
०५ सफौ/५९८ रविंद्र विठ्ठलराव अवचारे पो. स्टे आर्वी,
याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक महोदयांनी सांगितले की, “पोलीस दलात काम
करताना कुटुंब आणि कर्तव्य या दोन्ही आघाड्यांवर संतुलन राखणे कठीण असते. या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात अत्यंत निष्ठेने आणि शिस्तीने कर्तव्य बजावले आहे. त्यांचा हा अनुभव पोलीस दलासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल.”
या निरोप समारंभाला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या मनोगतातून पोलीस दलातील प्रवासाचे अनुभव कथन केले आणि जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानले. निवृत्त कर्मचारी यांचे परिवारातील व्यक्तीही या निरोप समारंभाला हजर होते.



