ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिव्याखाली जसा अंधार तसा पंचायत समितीचा भोंगळ कारभार

तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांच्याआढावा बैठकीत पत्रकारांना डावलले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 आमदार नव्हे कामदार यांनी गटविकास अधिकाऱ्या विरोधात कार्यवाही प्रस्तावित करण्याची मागणी

देऊळगाव राजा तालुक्यातील काही गावांना कायमस्वरूपी पाणीटंचाईने ग्रासले असून वर्षांनु वर्षे उलटली तरी संबंधित अधिकारी या प्रश्नाला गांभीर्याने घेत नसल्याने दरवर्षी पाणी टंचाई निवारणार्थ टँकरने पाणीपुरवठा करणे खाजगी विहिरी अधिकृत करणे या कामासाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत आहे मात्र कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक असे उपाययोजना आखण्यात संबंधित प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे दिनांक 27 एप्रिल २६ रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने पाणी टंचाई निवारणार्थ या विभागाचे आमदार मनोज कायंदे यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन केले होते. मात्र आढावा बैठकीत जसा दिव्याखाली अंधार असतो तसा पंचायत समितीतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊ नये याकरिता पत्रकारांना सपशेल या आढावा बैठकीपासून दूर ठेवण्यात आले होते यामुळे गटविकास अधिकारी यांचे विरोधात नाराजीचा सूर बाहेर येत असून या विभागाचे कर्तव्य दक्ष आमदार हे कामदार असल्याने त्यांनी याबाबत गटविकास अधिकारी यांचे विरोधात कार्यवाही प्रस्तावित करण्याची मागणी पुढे येत आहे.

याबाबत सविस्तर असे की देऊळगाव राजा तालुक्यातील रहिवाशांची तहान भागवी याकरिता शासनाने खडकपूर्णा नदीवर खडक पूर्णा प्रकल्पाचे काम पूर्ण केले अनेक गावांना या धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या असे असतानाही याच तालुक्यातील अनेक गावे ही अजूनही तहानलेलीच आहेत अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे मंजूर पाणीपुरवठा योजना निधी अभावी पूर्णत्वास गेलेल्या नाहीत त्यामुळे अनेक वर्षापासून अध्यापही अनेक गावात पाणीटंचाई सुरू आहे आणि पाणी टंचाई निवारार्थ आढावा बैठकीचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात आमदार मनोज कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते कागदोपत्रीच उपाय योजना आखण्यात आले असल्याने भविष्यात ज्या ज्या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे व ज्या ज्या गावात खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात येत आहे.

तेथील स्थिती सुधारणा नसल्याचे या आढावा बैठकीतील. चर्चे दरम्यान दिसून आले शासनाचे दरवर्षी लाखो रुपये खर्च होऊन अनेक गावे ही केवळ संबंधित अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे तहानलेलीच राहणार आहेत गटविकास अधिकाऱ्यांनी या आढावा बैठकीची माहिती पत्रकारापर्यंत पोहोचुच दिली नाही कारण त्यांच्या भोंगळ कारभाराचा भंडाफोड हे केवळ पत्रकारच करू शकतात ही भीती त्यांच्या मनात असल्याने त्यांनी पत्रकारांना या बैठकीपासून दूर ठेवले आमदार मनोज कायंदे यांनी याबाबत कारवाई प्रस्ताव करण्याची मागणी पुढे येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये