ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई

संबंधित वाहन चालक व्यक्तीवर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे नागरिकांनी पालन करावे या करीता मा. अपर पोलीस अधीक्षक, सदाशिव वाघमारे साहेब, वर्धा जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक पोलीस विभागतर्फे संपूर्ण वर्धा जिल्हयात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक २५.०४.२०२६ व २६.०४.२०२६ रोजी कलम १८५ मोवाका (दारु पिऊन वाहन चालविणे) या मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथील अंमलदार पोहवा/मुकेश राऊत ब.नं. १२६५, पोहवा / रियाज खान ब.नं. ६८८, पोहवा / शबीर सैयद ब.नं.८१४. सफो अनिल तिवारी ब.नं.४४३, पोशि/प्रदीप कोवळे ब.नं.९८३, पोशि/ दिलीप कामडी बं.नं.१६३ यांनी पेट्रोलोंग दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणा-या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या वाहन धारकांची नावे १) प्रशांत मधुकर सहारे वय ४५ वर्ष, रा. वार्ड क्र.१९ फुल फैल वर्धा, २) हरीचंद्र केशवराव कौरातो वय ५६ वर्ष रा. बार्ड नं. २ आकरे ले-आऊट सिंदी मेघे, वर्धा ३) स्वपनील विलासराव गांजरे वय ३७ वर्ष, रा. वार्ड क्र. १ गजानन नगर, वर्धा ४) सुरेश डोमाजी ठाकरे वय ४७ वर्ष, रा. धंतोली चौक, वर्धा या प्रमाणे नमुद वाहन चालक दारुच्या नशेत वाहन चालविताना मिळून आलेत.

तसेच वर्धा जिल्हयामध्ये वाढत्या अपघातावर प्रतिबंध घालण्याकरीता सदर विशेष मोहिम दररोज संपूर्ण वर्धा जिल्हयात राबविण्यात येणार असून नागरिकांना सुचित करण्यात येते की, बिना हेल्मेट मोटार सायकल, बिना सिटबेल्ट चारचाकी वाहन, अतो वेगाने व दारु पिऊन वाहन चालवू नये. वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरिकांना करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये