पोलीस ठाणे वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कामगीरी
अवैधरित्या मॅफेड्रॉन (एम.डि.) बाळगणाऱ्या एकास अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 28.04.2026 रोजी पोलीसांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून एन.डि.पी.स. कायदयातील तरतुदीनुसार रेड कार्यवाही केली असता आरोपी नामे शुभम संतोष गौतम वय 32 वर्ष रा. साई पार्क, सावंगी मेघे, वर्धा हा आपले ताब्यात असलेल्या सुझुकी एक्सेस मोपेड गाडीमध्ये अवैध्यरित्या मॅफेड्रॉन (एम.डि) अमली पदार्थ बाळगुन असतांना मिळुन आल्याने पालीसांनी त्यास अटक केली. दिनांक 28.04.2026 रोजी रात्रीचे सुमारास वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांना नाईट पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीवरून त्यांनी मा. पोलीस निरीक्षक संतोष ताले यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पंच, मापारी, फॉरेसिंक पथक व पोलीस स्टॉफसह कृषी उत्पन्न बाजार समिती परीसर वर्धा येथे नाकेबंदी करून आरोपीचे ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता वाहनाचे डिक्कीमध्ये 08.61 ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डि) अमली पदार्थ अंगझडतीत नगदी रक्कम व एक जुनी वापरती सुझुकी एक्सेस मोपेड गाडी निळ्या रंगाची असा एकुण जु. कि. 1,13,150 रू चा मुद्देमाल जप्त केला. हि कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री सौरभ अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशीव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री संतोष ताले यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, नितीन ईटकरे, महेद्र पाटील, रंजीत भुरसे, अमोल साळवन यांनी केली. त्यामुळे शहर परीसरात अवैध्य मॅफेड्रॉन (एम.डि) अमली पदार्थ विक्रीवर प्रतीबंध करण्यास पोलीसांना यश मिळाले. गुन्हयात अटक केलेल्या आरोपीवर यापुर्वी सुद्धा वेगवेगळ्या कलमाअन्वये भरपुर गुन्हे नोंद असल्याबाबत माहीती मिळाली आहे.



