शिक्षकांचा कार्यभार निश्चित करून पदमान्यतेतील त्रुटी दूर करा
गोंडवाना यंग टीचर्स संघटनेची सहसंचालक यांचेकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
– राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे परंतु दिनांक 1.10. 2025 च्या विद्यार्थी संख्येवर आधारित प्राध्यापकांचा कार्यभार निश्चित करताना उच्च शिक्षण विभागाने अनेक प्राध्यापकांना संरक्षित श्रेणीमध्ये टाकलेले आहे तसेच विविध महाविद्यालयामधील अनेक रिक्त जागा गोठवलेल्या आहेत. त्यामुळे सत्र 2026-27 मध्ये अनेक महाविद्यालयांना शासनाकडून तासिका कार्यभार तत्त्वावरील प्राध्यापक देखील मंजूर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिक्षक कार्यभार आणि पद मान्यतेत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे ,संघटनेचे कोषाध्यक्ष डॉ.जनार्दन काकडे तसेच संघटनेचे विभाग समन्वयक डॉ.शरद बेलोरकर यांनी नागपूर विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.संतोष चव्हाण यांना निवेदन दिले असूनसविस्तर चर्चा करण्यात आली .यावेळी प्रामुख्याने मार्गदर्शक प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा,प्राचार्य डॉ.देवेश कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माननीय सहसंचालक डॉ.संतोष चव्हाण यांनी सदर समस्या शासनाच्या निदर्शनात आणून देऊन त्या सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी संघटनेच्या वतीने खालील मागण्या मांडण्यात आल्या .मानव विज्ञान शाखेमध्ये आधीच्या पद्धतीप्रमाणे सामाजिक शास्त्रांसाठी प्रतिवर्ग 5 याप्रमाणे एकूण 15 पिरेडचा कार्यभार होता. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षकांच्या कार्यभारात लक्षणीय वाढ होऊन सत्र 2026-27 मध्ये हा कार्यभार प्रति विषय सुमारे 58 होत आहे परंतु प्राध्यापकांची संख्या फक्त 1 ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे पूर्णवेळ अथवा घड्याळी तासिका वरील पदे मंजूर करणे आवश्यक आहे.
वाणिज्य आणि विज्ञान शाखा मध्ये देखील कार्यभार वाढलेला असताना प्राध्यापकांची पदे मात्र कमी करण्यात आल्याचे निदर्शनास आणण्यात आले. मानव विज्ञान शाखेमध्ये आधीच्या पद्धतीप्रमाणे इंग्रजी भाषे करिता प्रति 4 तास आणि जे प्रत्येक 20 विद्यार्थ्यांच्या एका बॅचसाठी 1 याप्रमाणे ट्युटोरिअस असल्याने 120 विद्यार्थ्यांमागे 9 पिरेडचा चा कार्यभार देण्यात येत होता. त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेच्या प्राध्यापकांचा एकूण कार्यभार 27 पिरेडचा होता तसेच मराठी भाषेसाठी देखील प्रति वर्ग 4 प्रमाणे 12 चा कार्यभार होता. परंतु नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कोणता आधार घेण्यात आला हे स्पष्ट नसले तरी भाषेच्या प्राध्यापकांचा कार्यभार खूप कमी करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भाषांना एईसी, एसईसी, आय केस, ओई, मध्ये महत्त्वाचे स्थान असून चालू सत्रात विषय कोण शिकवणार असा प्रश्न उपस्थित झाल्याचे निदर्शनास आणले आहे.
वरील बाबी लक्षात घेता पदमान्यता देताना त्यास कोणता आधार आहे हे स्पष्ट नसल्याने सर्व महाविद्यालयात गोंधळाची स्थिती आहे.त्यामुळे शासन स्तरावरून महाविद्यालयातील शिक्षकांचा कार्यभार निश्चित करून द्यावे व पद मान्यतेच्या प्रक्रियेतील त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात आणि त्या दूर कराव्या अशी मागणी गोंडवाना यंग टीचर्स संघटनेच्या वतीने सहसंचालक नागपूर विभाग यांचे कडे केली आहे.



