ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कुल बस वाहतूक सुरक्षा समितीची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांच्या अध्यक्षते खाली व सचिव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मेंढे मॅडम, शिक्षणाधिकारी सर वाहतूक असोशियन अध्यक्ष देवाभाऊ निखाडे सर्व शाळेचे मुख्यध्यापक यांच्या सोबतच स्कुल बस सुरक्षा समितीची बैठक हि पोलीस अधीक्षक कार्यालय मध्येच संपन्न झाली.

सदर बैठकी मध्ये मा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल सर यांनी विदयार्थी वाहतूक करिता नेमलेल्या बसेस या योग्य असावेत, स्कुल बस मध्ये प्रथमउपचार पेटी, अग्नीरोधक यंत्र मशीन असावे, आग विझविण्याचे प्रशीक्षण चालक क्लीन्नर यांस असावे, स्कुल बस मध्ये cctv, GPS केमेरे आत व बाहेरील गेट दिसेल असेही असावे. चालक क्लीन्नर निरव्यासनी, चांगले वर्तुणूक असणारे असावे, वाहतूक नियमांचे त्यांनी नेहमीच पालन करायला पाहिजे.

ऑटो रिक्षास विध्यार्थी वाहतूक करण्याची परवानगी नाही आहेत, विद्यार्थी सुरक्षा हि महत्वाचे आहे, ई रिक्षा यांना सुद्धा विध्यार्थी वाहतुकीस मनाई आहे, स्कुल बसेस मध्ये तक्रार पेटी हि असावी तसेच स्कुल बस मध्ये पोलीस हेल्प लाईन नंबर 112 हा लिहावे. RTO अधिकारी व वाहतूक पोलीस हे सतत स्कुल बस ची योग्यपने वापर होतो आहेत किंवा नाही हे तपासनी करीत रहातील, स्कुल बस ची वेग मर्यादा हि कमी ठेवावे व अपघात होणार नाही याची शाळा प्रशासन योग्य दक्षता घेतील, चालक बस चालवीतना मोबाईल चा वापर करणार नाहीत, दारू पिऊन कोणीही अपघात करणार नाही सतत मेडिकल तपासानी केली जाईल व वाहन परमिट नीलम्बन केले जाईल,याबाबत मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांनी सर्वांना सूचना दिल्यात,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये