ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोरी कोकाटे येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन केली आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू तालुक्यातील बोरी कोकाटे येथे एका 48 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सुधाकर नत्थुजी आतराम (वय 48) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर आतराम हे भूमिहीन असून अत्यंत साधे जीवन जगत होते. त्यांनी आपल्या घरासमोरील झाडाला गळफास लावून जीवन संपविल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व याबाबत सेलू पोलिसांना कळविण्यात आले.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणी व शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

या घटनेमुळे बोरी कोकाटे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, सुधाकर आतराम यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये