ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“मध्यपी” अन्न पुरवठा अधिकाऱ्याचा महाप्रताप

रस्त्यावर वाहन लावून वाहतूक अडविली वाहतूक पोलिसांसोबत घातली हुज्जत 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तहसील कार्यालयांतर्गत येत असलेल्या अन्न पुरवठा विभागात कार्यरत एका पुरवठा अधिकाऱ्यांने दारूच्या नशेत आपली कार मुख्य मार्गांवर मधोमध लावली. यामुळे बराच काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी गेलेल्या वाहतूक शिपायासोबत पुरवठा निरीक्षकाने हुज्जत घातली. या गंभीर प्रकारानंतर त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले.

काल रात्री गोंडपिपरी येथील मुख्य मार्गांवर हा प्रकार घडला.

गोंडपिपरी तहसील कार्यालयाअंतर्गत असलेल्या पुरवठा विभागात शिवाजी पतंगे हे पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या हेकड स्वभावाने ते आधीच वादग्रस्त ठरले आहेत.

काल रात्री आपल्या कारने मुलीला घेऊन ते मुख्य मार्गांवरून प्रवास करीत होते. दरम्यान त्यांच्या वाहणाला कुणीतरी कट मारून समोर गेला. या प्रकारनंतर पतंगे यांनी मुख्य मार्गांवरच आपली कार आडवी लावली. यामुळे बराच काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. वाहतुक शिपाई वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता गेले असता व पतंगे यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता पतंगे यांनी त्यांच्याधी हुज्जत घातली.

मिळालेल्या माहितीनुसार पतंगे हे जास्त प्रमाणात मद्यपान करून होते. सदर घटनेनंतर पतंगे यांना पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले. प्रशासनातील अधिकारी जर अशापद्धतीने कायदा मोडत असतील तर काय म्हणावे, असा संतप्त सवाल आता विचारल्या जात आहे. गोंडपिपरी शहरात या प्रकाराची चर्चा सध्या चौकाचौकांत, कट्ट्यांवर सुरु आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये