ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) अंमली पदार्थाची विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 22 एप्रिल 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीतील हनुमान नगर बोरगाव मेघे वर्धा येथील बंद जिनींगमागील खुल्या परीसरात एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, तेथे आरोपी 1) कार्तिक प्रमोद वाघमारे, वय 21 वर्ष, 2) रक्षक गौतम देशभ्रतार, वय 23 वर्ष, दोन्ही रा. हनुमान नगर बोरगाव मेघे वर्धा हे त्यांचे अॅक्सेस 125 मोपेड क्र. एम.एच.32ए.यु.6679 ने मोक्कावरून येवुन मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) अमली पदार्थांची विक्री करतांना रंगेहाथ मिळुन आल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीतांचे ताब्यातुन निव्वळ 03 ग्रॅम 63 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) अंमली पदार्थ, 01 मोपेड व 04 मोबाईलसह जु.कि. 2,82,520 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीतांविरूध्द पो.स्टे. वर्धा शहर येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. विजयसिंग गोमलाडु, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये