ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हयातील ग्रामिण भागात संवाद उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सेलू जिल्हा वर्धा मा. पोलीस अधिक्षक साहेब वर्धा याचे संकल्पनेतुन वर्धा जिल्हयातील ग्रामिण भागात संवाद उपक्रम राबण्यिात येत असुन जिल्हयातील दुर्गम ग्रामिण भागातील नागरीकांच्या विवीध समस्या जाणून घेवुन त्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने तसेच शासनाच्या विशेष योजनांचा लाभ मिळणेकरीता इत्यंभूत माहिती देण्याकरीता नागरीकांना एकाच मंचावर प्राप्त व्हावी तसेच नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास अधिक दूढ व्हावा या उददेशाने आज दिनांक २३.०४. २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. मौजा कान्हापुर येथील सभागृहात मा. श्री. सौरभकुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक साहेन वर्षा, श्री. प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब वर्षा, श्री देवेंद्र ठाकूर साहेब पोलीस निरीक्षक, सेलू यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. तसेच सदर कार्यक्रमाकरीता महसुल विभाग, शिक्षण विभाग, कृक्षी विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग, विदयुत महावितरण चे अधिकारी उपस्थित होते. तसेच गावातील ग्रामस्थ, पोलीस पाटील, तसेच पोलीस स्टेशन सेलू येथील अंमलदार उपस्थित होते.

सदर कार्यकमा दरम्यान मौजा कान्हापुर येथील प्रामस्थांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता, उपस्थित नागरीकांनी गावातील पोलीस विभागा संबंधीत तसेच महसुल, वन विभाग, शिक्षण, विदयुत विभागाशी संबंधीत समस्या सांगितल्या, सदर समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने मा. पोलीस अधिक्षक सा. वर्षा यांनी सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले. यावर पोलीस प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कडक कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले. यावेळी उपस्थित प्रामस्थ व विवीध विभागाच्या अधिका-यांना कायदयाची माहिती देवुन त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे, सायबर गुन्हयांपासून सतर्क राहण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यकमा दरम्यान पोलीस विभागासंबंधीत तकारीबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात येईल तसेच पोलीस विभागाव्यतीरीक्त इतर विभागाशी संबंधीत तकारीचा पाठपुरावा करून त्या सोडविण्याकरीता त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत कळविण्यात आले आहे. पोलीस व नागरीक यांच्यात परस्पर सहकार्य वाढल्यास गुन्हेगारी विरुध्द प्रभावी नियंत्रण मिळवुन कायदा व सुव्यवस्था अबाधीत देवता येईल, असे मत मा. पोलीस अधिक्षक साहेब वर्धा यांनी व्यक्त केले.

सदर संवाद उपक्रम हा केवळ औपचारिक बैठक नसुन त्यामागे नागरीक व पोलीस यांच्यामध्ये सलोख्याचे व विश्वासाचे संबंध प्रस्तापित बहाने या उददेशाने प्रेरीत होवुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये