रूबा चौकातील मोबाईल शॉपी फोडणा-या दोन अट्टल आरोपींना हिंगणघाट पोलीसांनी केली अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 28/07/2026 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नामे रूशीकेष बालाजी वासेकर रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून अप.क्र. 1215/26 कलम 305(अ),331(3),(4) बी.एन.एस. अन्वये चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला. दि. 27/07/26 चे रात्री 09/00 वा. ते दि. 28/07/26 चे सकाळी 09/00 वा दरम्यान फिर्यादी यांचे रूबा चौक हिंगणघाट येथे असलेले बालाजी मोबाईल शॉपीचे बंद सेटरचे लॉक कोणीतरी अज्ञात इसमांनी तोडुन मोबाईल दुकानाता ठेवुन असलेले वेगवेगळया कंपनीचे किपॅडचे 13 मोबाईल फोन, 36 नग वेगवेगळया कंपनीचे ईअर बडस् ब्लुटुथ, लहान मोठे 7 ब्लुथुट स्पिकर, 1 होमथेटर,तसेच वेगवेगळया कंपनीचे 10 अॅडराईट मोबाईल, 1 पावरबॅक व हिटर मषीन आणि इतर साहित्य असा एकुन की. 1,50,600/रू. चा मुदेद्माल चोरून होता. गुन्हा नोंद होताच पो.स्टे. हिंगणघाट चे ठाणेदार श्री. अनिल राउत सा. यांचे आदेषान्वये पोलीस स्टेषन हिंगणघाट गुन्हे प्रगटिकरण पथकातील पो.अंमलदार यांनी अज्ञात चोरटयाचा षोध सुरू केला पोलीसांनी सि.सि.टि.व्हि फुटेजचे सुक्ष्म निरिक्षण करून व मिळालेल्या गुप्तमाहिती वरून आरोप क्र. 1) यश विठ्ठल ठाकरे वय 21 वर्श रा. संत तुकडोजी वार्ड,हिंगणघाट क्र. 2) लोकेश मेघराज तांदुळकर वय 26 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट यांना ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयात अटक करून अधिक विचारपुस करून त्याचे कडुन गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल की. 1,50,600/रू. व गुन्हा करतवेळी वापरलेली मोटर सायकल की. 30,000/रू. एकुन 1,80,600/रू. चा मुद्देमाल जप्त करून मोबाईल षॉपी चोरीचा गुन्हा उघड आणला. विशेष म्हणजे यातील अट्टल आरोपी क्र. 1) यश ठाकरे याला मे महिन्यामध्ये सुध्दा गुन्हे प्रगटीकरण पथकानी घरफोडीचे गुन्हा अटक केली होती.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक सा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी सा. श्री. सुशीलकुमार नायक यांचे मार्गदर्शानामध्ये पो.स्टे. हिंगणघाट येथील ठाणेदार श्री. अनिल राउत याचे आदेशाने व प्रत्यक्ष मार्गदर्षनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. नरेंद्र डहाके, पो.ना. नरेंद्र आरेकर, निलेशसिंग सुर्यवंशी पो.शि. सागर सांगोले, प्रमोद जाधव यांनी केली गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.



