ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुपौर्णिमा औचित्यावर प्रबोधनासह वृक्षसंवर्धनाचा जागर

जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ, गवराळा यांचे अभिनव आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त गणपती वॉर्ड, गवराळा येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळाच्या वतीने भजन-पूजन, प्रबोधन आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार हभप सौ. सुवर्णा पिंपळकर यांनी गुरुतत्त्वाचे महत्त्व, संस्कार आणि समाजप्रबोधन यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे पाईक विशाल गावंडे, कला क्षेत्रातील रमेश खातखेडे तसेच जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ संचालित कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी परिसर स्वच्छतेसोबतच वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. “पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत उपस्थितांना सदगुरू जगन्नाथ महाराज यांचे स्मरण करून वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ देण्यात आली.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अध्यात्म, समाजप्रबोधन आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये