ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
  वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 28 जुलै 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे ॲटी नार्काेटिक्स पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील नगर परीषद वाचनालयाचे मागे टाका ग्राऊंड हिंगणघाट येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता,  आरोपी साहिल उर्फ नायडु सतिश माणिके, वय 24 वर्ष, रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट हा मोक्कावर रंगेहाथ गांजा अंमली पदार्थांची विक्री करतांना मिळुन आला असुन, अंगझडती दरम्यान त्याचेजवळ गांजा अंमली पदार्थ व नगदी रक्कम मिळुन आली.
तरी नमुद आरोपी हा गांजा मालाची तस्करी करून विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीचे ताब्यातुन 799 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, नगदी रक्कमसह जु.किं. 21,925 रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध पो.स्टे. हिंगणघाट येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी,पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, अनुप राऊत,रवि पुरोहित, सागर भोसले, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये